Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

मुळेगाव तांडा मतदान केंद्रात ईव्हीएमखाली लिंबू-मिरची, टाचण्या

रविकांत बगले by रविकांत बगले
February 8, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यात खळबळ

सोलापूर ; सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदानाला काही तासांचा अवधी असतानाच, लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे शिंदेसेनेचे उमेदवार चरण चवरे यांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार समोर आल्यानंतर अवघ्या २४ तासांतच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रात थेट ईव्हीएम मशिनखाली जादूटोण्याचे साहित्य ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकशाहीचा उत्सव सुरू असताना मतदान केंद्रातच लिंबू-मिरची, बिबा व टाचण्या टोचून ठेवण्यात आल्याने मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता.

 

https://solapurnewsplus.com/wp-content/uploads/2026/02/VID-20260208-WA0028.mp4

मतदानादरम्यान काय घडलं?

मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना एक महिला मतदार मतदान करून बाहेर येत असतानाच अचानक चक्कर येऊन कोसळली. शुद्धीवर आल्यानंतर त्या महिलेने ईव्हीएम मशिनखाली लिंबू-मिरची व बिया ठेवलेले असल्याचे पाहिल्याचे सांगितले. या धक्कादायक माहितीची खातरजमा करण्यासाठी पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी तातडीने मतदान केंद्रात पाहणी केली.

पाहणीदरम्यान ईव्हीएम मशिनखाली टाचण्या टोचलेले लिंबू-मिरची व बिबा आढळून आला, हा प्रकार पाहून उमेदवार, मतदान कर्मचारी व उपस्थित प्रतिनिधी चक्रावून गेले.

अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

या प्रकरणात मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या काही अधिकारी अथवा उमेदवारांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. “लोकशाहीच्या मंदिरात जादूटोणा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मतदारांनीही केली आहे.

कोण ठेवलं जादूटोण्याचं साहित्य?

थेट मतदान केंद्रात ईव्हीएम मशिनखाली जादूटोण्याचं साहित्य नेमकं कोणी ठेवलं, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. केंद्राध्यक्षांनी या विषयावर मौन बाळगले असून, मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एखाद्या मतदारानेच हे साहित्य ठेवले असावे, असा प्राथमिक अंदाज कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, मतदान केंद्रावर सीसीटीव्ही नसल्यामुळे नेमका दोषी कोण, हे अद्याप अस्पष्टच आहे.

दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, दक्षिण सोलापूरसह शेजारच्या अक्कलकोट तालुक्यातही या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.आता या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह सपत्नीक मतदानाचा हक्क, बजविला

Next Post

अक्कलकोट तालुक्यात सचिन दादाचीच वर्चस्व….

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
अक्कलकोट तालुक्यात सचिन दादाचीच वर्चस्व….

अक्कलकोट तालुक्यात सचिन दादाचीच वर्चस्व....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697