Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

सभापतिपदावर रश्मी हिप्परगींची जोरदार चर्चा

रविकांत बगले by रविकांत बगले
February 11, 2026
in राजकीय, सोलापूर
0
सभापतिपदावर रश्मी हिप्परगींची जोरदार चर्चा
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. जिल्हा परिषदेच्या ६ पैकी ४ जागांवर आणि पंचायत समितीच्या १२ पैकी ८ जागांवर विजय मिळवत भाजपने तालुक्यात स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वावर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे चित्र दिसत आहे.
पंचायत समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत
पंचायत समितीमध्ये भाजपचे आठ सदस्य निवडून आले असून शिंदेसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमत नसल्यामुळे विरोधकांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

भाजपकडून विजयी झालेले सदस्य पुढीलप्रमाणे —चपळगाव गण : सागर कल्याणशेट्टी

कुरनूर गण : विनोद मोरे

वागदरी गण : आप्पासाहेब किवडे

जेऊर गण : विमल गव्हाणे

दहिटणे गण : आशा इंगळे

मंगरूळ गण : रश्मी हिप्परगी

सुलेरजवळगे गण : उत्तमा वाघमारे

(तसेच आणखी एक सदस्य)

तर शिंदेसेनेकडून —

शिरवळ गण : गणेश मोरे

सलगर गण : भीमण्णा सोलापुरे

मुगळी गण : संगीता पाटील

तोळणूर गण : शीतल म्हेत्रे सभापतिपदासाठी रश्मी हिप्परगींचे नाव आघाडीवर पंचायत समितीच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी सभापतिपद आरक्षित आहे.

 

 

 

Previous Post

शांभवी कल्याणशेट्टी जिल्हा परिषद अध्यक्षपदी? यांच्या नावाची जिल्ह्यात जोरदार चर्चा 

Next Post

सामाजिक शास्त्रांमध्ये बहुविषयक संशोधन आवश्यक: कुलगुरू डॉ. दास

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
सामाजिक शास्त्रांमध्ये बहुविषयक संशोधन आवश्यक: कुलगुरू डॉ. दास

सामाजिक शास्त्रांमध्ये बहुविषयक संशोधन आवश्यक: कुलगुरू डॉ. दास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697