Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

बारावी परीक्षा केंद्राला दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली भेट..!

रविकांत बगले by रविकांत बगले
February 18, 2026
in सोलापूर
0
बारावी परीक्षा केंद्राला दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली भेट..!
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बारावीच्या परीक्षा केंद्रांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अचानक भेटी देऊन पाहणी केली. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळच्या पुणे विभागातर्फे सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी ठेवण्यात आली आहे.

सीईओ कुलदीप जंगम यांनी बार्शी तालुक्यातील चार परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे का आणि परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरू आहेत का याची पाहणी केली. परीक्षा केंद्रांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही व्यवस्थेमुळे सोलापूर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

उपसंचालक मोरे यांनी केले कौतुक…
पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मोरे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कॉपीमुक्त अभियानाची पाहणी केली. परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही व्यवस्थेमुळे हे अभियान यशस्वी होत असल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

माणुसकीचा झरा अखंड वाहत राहिला!

Next Post

१२ वी परीक्षेतील गैरप्रकार सोलापुरातून उघड, प्राचार्याविरुद्ध गुन्हा

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
१२ वी परीक्षेतील गैरप्रकार सोलापुरातून उघड, प्राचार्याविरुद्ध गुन्हा

१२ वी परीक्षेतील गैरप्रकार सोलापुरातून उघड, प्राचार्याविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697