Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

१२ वी परीक्षेतील गैरप्रकार सोलापुरातून उघड, प्राचार्याविरुद्ध गुन्हा

रविकांत बगले by रविकांत बगले
February 19, 2026
in सोलापूर
0
१२ वी परीक्षेतील गैरप्रकार सोलापुरातून उघड, प्राचार्याविरुद्ध गुन्हा
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: माळीनगर (ता. माळशिरस) येथील मॉडेल ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी रसायन शास्त्र परीक्षेच्या पेपरला कॉपी करताना एक विद्यार्थिनी आढळून आली. जिल्हा प्रशासनाने कॉपी मुक्त अभियानाचा भाग म्हणून केंद्रावर बसवलेल्या सीसीटीव्हीचे कंट्रोल युनिट सोलापूर जिल्हा परिषदेत उभारले आहे. माळीनगरहून सुमारे १२५ किमी अंतरावरील नियंत्रण कक्ष पथकास कॉपीचा प्रकार निदर्शनास आला. लगेच दक्षता समितीचे सचिव तथा माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी संबंधित कॉलेजच्या प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश माळशिरस बीडीओला दिले.

कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्याम र्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षण विभागाने बारावी परीक्षेच्या सर्व केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. केंद्रांमधील सीसीटीव्ही जिल्हा परिषदेच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. माळीनगर येथील दि मॉडेल कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थिनी कॉपी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजताच तात्काळ परीक्षा केंद्र प्रमुखांशी संपर्क साधला. प्राचार्य व इतर शिक्षकांनी परीक्षा कक्षात धाव घेऊन संबंधित विद्यार्थिनीची तपासणी केली असता कॉपी करताना ती आढळली.

 

हा प्रकार गंभीर असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केंद्रप्रमुख प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल करून याबाबतचा अहवाल तात्काळ कार्यालयाला सादर करावा, असा आदेश माळशिरसच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिला. उशीरापर्यंत गुन्हा दाखल केलेला नव्हता.

Previous Post

बारावी परीक्षा केंद्राला दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली भेट..!

Next Post

सोलापूर जिल्हा विशेष: जिल्ह्यातील ६५५ ग्रामपंचायतींवर आता ‘सरपंच’च प्रशासक!

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
सोलापूर जिल्हा विशेष: जिल्ह्यातील ६५५ ग्रामपंचायतींवर आता ‘सरपंच’च प्रशासक!

सोलापूर जिल्हा विशेष: जिल्ह्यातील ६५५ ग्रामपंचायतींवर आता 'सरपंच'च प्रशासक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697