सोलापूर .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता सहावी ते बारावीतील मुलींसाठी “राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान” राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शिक्षण परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ७५९ शाळांमधील मुली तसेच महिला शिक्षकांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, दिनांक २५ मार्चपर्यंत सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या माध्यमातून विद्यार्थिनींना आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची कौशल्ये आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळांमधील मुली व महिला शिक्षकांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले आहे.

