Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभवही मिळणार

रविकांत बगले by रविकांत बगले
March 2, 2026
in मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन
सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भू-अवकाशीय क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारी राज्यस्तरीय दोन दिवसीय ड्रोन-आधारित प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या भूशास्त्र संकुल आणि डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक युगात अत्यंत महत्त्वाचा ठरत असून विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाकडे वळणे ही काळाची गरज आहे. कृषी, सर्वेक्षण, नगररचना, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण अभ्यास आदी विविध क्षेत्रांत ड्रोनचे वाढते योगदान लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यासपीठावर कार्यशाळेचे संयोजक डॉ. वीरभद्र दंडे (विभागप्रमुख, भूगोल विभाग, डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालय), भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विनायक पी. धुळप, तसेच कार्यशाळेचे समन्वयक श्री. अतिश धेंडे, डॉ. महादेव लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विनायक धुळप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ड्रोन आधारित भू-अवकाशीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकास, संशोधनवृद्धी आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळणार आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभवही मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. व्ही. सी. दंडे यांनी केले. या प्रसंगी डॉ. चेतन हुलसुरे, डॉ. धानेश लिगाडे, प्रा. ज्योती लातुरे, प्रा. पूजा होळीकट्टी, डॉ. अनिल येडगे, डॉ. मंगेश वेदपाठक, प्रा. अक्षय चव्हाण, प्रा. प्रशांत उन्हाळे, प्रा. सिद्धाराम चौगुले, प्रा. मृण्मयी गवळी, प्रा. महेश कंदी यांच्यासह सुमारे २५० विद्यार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित रोजगार संधींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Previous Post

अक्कलकोट येथे मावा व गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई

Next Post

रंजिता चाकोते यांची स्थायी समिती सभापती पदी बिनविरोध निवड!

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

रंजिता चाकोते यांची स्थायी समिती सभापती पदी बिनविरोध निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697