Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज प्रा. ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

रविकांत बगले by रविकांत बगले
March 5, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूरकरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्योती वाघमारे यांना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली.
बुधवारपर्यंत राहुल शेवाळे आणि गजानन किर्तीकर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र अखेर पक्षश्रेष्ठींनी प्रा. वाघमारे यांच्या नावावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी बहाल केली. या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोण आहेत प्रा. ज्योती वाघमारे?
प्रा. ज्योती वाघमारे या शैक्षणिक क्षेत्रातील भक्कम पार्श्वभूमी असलेल्या आणि प्रभावी वक्तृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या नेत्या आहेत. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. घरातूनच त्यांना सामाजिक चळवळीचे धडे मिळाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षातील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली.
२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत राज्यभर पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून माध्यमांमध्ये आक्रमक आणि प्रभावी मांडणी करत त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.
कार्याची दखल, सोलापूरला प्रतिनिधित्व
राज्यसभेची उमेदवारी ही त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि पक्षनिष्ठेची पावती मानली जात आहे. पक्षनेतृत्वाने त्यांच्या कामाची दखल घेत सोलापूरच्या प्रतिनिधित्वाला संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सर्व स्तरातून स्वागत
प्रा. ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीनंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध स्तरांतून आनंद व्यक्त केला जात आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सोलापूरच्या दृष्टीने ही ऐतिहासिक संधी मानली जात असून, राज्यसभेतून सोलापूरच्या प्रश्नांना प्रभावी आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

रंजिता चाकोते यांची स्थायी समिती सभापती पदी बिनविरोध निवड!

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद परिचारक; महिला जिल्हाध्यक्षपदी मृणालिनी शिंदे

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद परिचारक; महिला जिल्हाध्यक्षपदी मृणालिनी शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697