गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्रामदैवत कल्मेश्वर यात्रेच्या पावती-पुस्तिकांचे पूजन संपन्न.

सोलापूर प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे ग्रामदैवत श्री कलेमश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर देणगी पावती-पुस्तिकांचे विधिवत पूजन करण्यात आले.
धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पारंपरिक विधीपूर्वक पूजन करून आगामी यात्रा उत्सवाची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली.
तसेच यात्रेचे नियोजन शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
देवस्थान ट्रस्टतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, यात्रेसाठी देणगी/वर्गणी केवळ अधिकृत पावती पुस्तके द्वारे देण्याचा आव्हान यावेळी करण्यात आली.
यात्रा उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानाचे ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत बगले यांनी केले.
यावेळी ट्रस्ट चे उपाध्यक्ष नागनाथ पाटील सचिव उमेश पुजारी खजिनदार नागनाथ खुने, सखजिनदार अंबादास देवकते, विश्वस्त चंद्रकांत बाके, सुरेश चव्हाण, विठ्ठल निम्बर्गी ,महादेव घोडके, रविकांत कापसे ,भगवान इंगळे, सलीम मुल्ला ,शीलवंत बगले,
राजकुमार नाव्ही, लक्ष्मण कोळी, बिरणा पुजारी यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते .
यावेळी ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरात विधिवात पूजा करून या यात्रेच्या देणगी पुस्तकाच्या शुभारंभ यावेळी करण्यात आला. .
यावेळी यल्लप्पा बगले श्रीशैल न्हावी अंबादास घोडके श्रीशैल फुलारी आकाश जाधव यांच्यासह
भक्तगण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते