Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

आठ हजार विद्यार्थ्यांचा प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या केंद्रांना अचानक भेटी

रविकांत बगले by रविकांत बगले
March 22, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आठ हजार विद्यार्थ्यांचा प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या केंद्रांना अचानक भेटी

सोलापूर | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा टक्का वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेला रविवारी तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी विविध केंद्रांना अचानक भेटी देत परीक्षेच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
इयत्ता तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, या उद्देशाने ही प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत परीक्षा शांततेत पार पडली.
परीक्षा सुरू असल्याची माहिती मिळताच उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी बाळे येथील राजीव प्राथमिक शाळेच्या केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख, उपगटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड, केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, मुख्याध्यापक मोहन घोडके तसेच विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे अमोल ढेपे आदी उपस्थित होते.


विद्यार्थ्यांशी आपुलकीचा संवाद
केंद्रभेटीदरम्यान इंद्रजीत पवार यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढवला. प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जाऊन त्यांनी विचारपूस करत प्रोत्साहन दिले, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
गुणवंतांचा होणार सन्मान
प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती इंद्रजीत पवार यांनी दिली.
एकूणच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा परिषदेचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र दिसून आले.

Previous Post

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्रामदैवत कल्मेश्वर यात्रेच्या पावती-पुस्तिकांचे पूजन संपन्न.

Next Post

जिल्हा परिषद बांधकाम समितीची आढावा बैठक; अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

जिल्हा परिषद बांधकाम समितीची आढावा बैठक; अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697