Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

जिल्हा परिषद बांधकाम समितीची आढावा बैठक; अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

शाळा, आरोग्य केंद्रे व अंगणवाडी कामांवर विशेष भर; १००% निधी खर्चाचे आदेश.

रविकांत बगले by रविकांत बगले
March 23, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद बांधकाम समितीची आढावा बैठक; अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्दे

शाळा, आरोग्य केंद्रे व अंगणवाडी कामांवर विशेष भर; १००% निधी खर्चाचे आदेश

सोलापूर | प्रतिनिधी

जिल्हा परिषद सोलापूरच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी दुपारी ११ वाजता संपन्न झाली. समितीचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सन २०२४-२५ मधील मंजूर कामांची लेखापरीक्षणनिहाय समीक्षा करण्यात आली. मंजूर सर्व कामे निश्चित कालावधीत पूर्ण करून १०० टक्के निधी खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
तसेच शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व अंगणवाडी येथील स्वच्छतागृहांची देखभाल चांगल्या दर्जाची ठेवण्यावर भर देण्यात आला. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी जास्तीत जास्त शाळा मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
ज्या ठिकाणी शाळा किंवा बांधकामे अपूर्ण अवस्थेत आहेत, त्या ठिकाणी प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. शासन निर्णयानुसार आवश्यक कारवाई करून निकृष्ट व अपूर्ण कामांवर कठोर भूमिका घेण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.

Previous Post

आठ हजार विद्यार्थ्यांचा प्रज्ञाशोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या केंद्रांना अचानक भेटी

Next Post

पूनम गेटवर बँक कर्मचाऱ्यांचे निदर्शने; मागण्यांसाठी फेडरेशन आक्रमक.

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

पूनम गेटवर बँक कर्मचाऱ्यांचे निदर्शने; मागण्यांसाठी फेडरेशन आक्रमक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697