Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

पूनम गेटवर बँक कर्मचाऱ्यांचे निदर्शने; मागण्यांसाठी फेडरेशन आक्रमक.

रविकांत बगले by रविकांत बगले
March 24, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पूनम गेटवर बँक कर्मचाऱ्यांचे निदर्शने; मागण्यांसाठी फेडरेशन आक्रम

सोलापूर | प्रतिनिधी

फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन्सच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पूनम गेट येथे बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या सोलापूर युनिटतर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाच्या विविध धोरणांविरोधात फेडरेशनने देशभरातील झोनल कार्यालयांसमोर निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत सोलापूरमध्येही स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी
युनियनचे सचिव ऑब्री अल्मेडा यांनी केला “कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन उभारण्यात आले असून, व्यवस्थापनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

https://solapurnewsplus.com/wp-content/uploads/2026/03/video_20260324_183843.mp4

या आंदोलनाद्वारे युनियनने लिपिक व अधिनस्थ कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती करावी, बँकेच्या नफ्यात कर्मचाऱ्यांना समान वाटा द्यावा, व्यवस्थापनाचे दुटप्पी धोरण तात्काळ थांबवावे, अशा प्रमुख मागण्या केल्या. याशिवाय अंतर्गत चौकशी प्रक्रियेचा गैरवापर थांबवून कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.

Previous Post

जिल्हा परिषद बांधकाम समितीची आढावा बैठक; अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

रविकांत बगले

रविकांत बगले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697