Friday, July 17, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

रोजगार हमीतील डेटा एंट्री ऑपरेटरच्या कामकाजाची चौकशी करून बदलीची मागणी

रविकांत बगले by रविकांत बगले
July 8, 2026
in सामाजिक, सोलापूर
0
रोजगार हमीतील डेटा एंट्री ऑपरेटरच्या कामकाजाची चौकशी करून बदलीची मागणी
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेतील डेटा एंट्री ऑपरेटर मुस्ताकिम अत्तार यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून तात्काळ बदली करावी, तसेच आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य उत्तम पिरण्णा वाघमारे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून त्याच पदावर कार्यरत असून ग्रामपंचायतींमधील जलजीवन मिशन, नागरी सुविधा व विविध विकासकामांच्या कार्यादेश (वर्क ऑर्डर), मंजुरी, नोंदी तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामकाज हाताळत आहेत. या प्रक्रियेत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, शासकीय नियमांचे उल्लंघन व आर्थिक अनियमितता होण्याची शक्यता असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

 

तसेच संबंधित कर्मचाऱ्याला काही अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याने नियमबाह्य पद्धतीने कामकाज सुरू असल्याचा दावा करत निष्पक्ष चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करावी, संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, दोषी आढळल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई करावी आणि झालेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

 

याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही उत्तम वाघमारे यांनी निवेदनातून दिला आहे.

याप्रसंगी शिवाजी स्वामी विजयकुमार पाटील नागनाथ खुने आदी उपस्थित होते

Previous Post

विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सर्व राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणांनी नियमांचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रविकांत बगले

रविकांत बगले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697