Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

हत्तूरच्या विकासासाठी भरभरून निधी देणार ; सुभाष देशमुख यांची ग्वाही

रविकांत बगले by रविकांत बगले
February 2, 2026
in राजकीय, सोलापूर
0
हत्तूरच्या विकासासाठी भरभरून निधी देणार ; सुभाष देशमुख यांची ग्वाही
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ; हत्तूर ; बरूर येथील हविनाळे घराणे हे वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करीत आहेत. तालुका, जिल्ह्यासह परराज्यातील अनेक रूग्णांना जीवदान देण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. डाॅ. चनगोंडा हविनाळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून या परीसरातील गावांच्या विकासास हातभार लावला आहे. त्यामुळे डाॅ. हविनाळे यांच्या स्नुषा उज्वला हविनाळे यांना समाजसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणे गरजेचे आहे. हविनाळे यांना निवडून दिल्यास हत्तूर मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे हत्तूर गटामध्ये सत्ता परीवर्तन करून भाजपाला विकास करण्याची संधी देण्याचे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले .

जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचाराचा शुभारंभ हत्तुर येथे सोमेश्वर व बनसिध्देश्वर देवाच्या चरणी नारळ वाढवून आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार देशमुख बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, आप्पासाहेब मोटे, डाॅ. चनगोंडा हविनाळे, डॉ. अनिल हविनाळे, राजेंद्र कुलकर्णी, बनसिद्ध पटेवडियर, प्रशांत सलगरे , विक्रांत हविनाळे, भाजपाच्या उमेदवार उज्वला हविनाळे, संदिप टेळे व पंचप्पा धनशेटी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेत हत्तुर जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या उमेदवार उज्वला हविनाळे यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधत आपल्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा अनुभव मांडला. यावेळी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या विकास, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणा साठी त्यांनी मांडलेली स्पष्ट व ठोस भूमिका उपस्थित नागरिकांच्या पसंतीस उतरली. उज्वला हवीनाळे या उच्चशिक्षित डॉक्टर असून कोरोना महामारीसारख्या कठीण काळात त्यांनी समाजसेवेला प्राधान्य देत अनेक कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी पंचायत समितीचे उमेदवार पंचप्पा धनशेट्टी यांनीही आपले मनोगत केला

Previous Post

६ फेब्रुवारीकडे सर्वांचे लक्ष ; महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर निश्चित !

Next Post

गुंडगिरीला नाही, विकासालाच मत द्या : आ. सचिन कल्याणशेट्टीं

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
गुंडगिरीला नाही, विकासालाच मत द्या : आ. सचिन कल्याणशेट्टीं

गुंडगिरीला नाही, विकासालाच मत द्या : आ. सचिन कल्याणशेट्टीं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697