Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

रविकांत बगले by रविकांत बगले
March 1, 2026
in महाराष्ट्र, सोलापूर
0
रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ; जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने आयोजित रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास तुझा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कौंड्याल, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिका आयुक्त , सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, नगरसेविका रोहिणी तडवळकर, जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

सोलापूर जिल्ह्यासाठी २० कोटींचा ‘उमेद मॉल’
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरातील महिला बचतगटांसाठी २० कोटी रुपये खर्चून ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. राज्यातील पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये मॉल मंजूर झाले असून, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होईपर्यंत ‘उमेद’ अभियान थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून महिला सक्षमीकरणाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात ‘उमेद’साठी स्वतंत्र कार्यालय उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे धनादेश विविध महिला बचतगटांना मंत्री गोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच त्यांनी महिला बचतगटांच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन करून पाहणी केली. कार्यक्रमाचे आभार प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी मानले, तर सूत्रसंचालन अभिराम सराफ यांनी केले.

Previous Post

एकतर्फी प्रेमाच्या बदनामीमुळे पती-पत्नी संपवले जीवन सुसाईड नोट मुळे गंभीर माहिती उघड.. 

Next Post

अक्कलकोट येथे मावा व गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
अक्कलकोट येथे मावा व गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई

अक्कलकोट येथे मावा व गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697