Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..

रविकांत बगले by रविकांत बगले
February 16, 2026
in क्राईम, सोलापूर
0
जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सात पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी बदल्या केल्या आहेत. त्यात मोहोळ, मंद्रूप, कामती, वेळापूर, माढा, नातेपुते पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

मोहोळ पोलिस ठाण्याचे प्रभारी हेमंत शेडगे यांची बदली पुणे ग्रामीणमध्ये झाली आहे. त्यामुळे मोहोळ पोलिस ठाण्याची जबाबदारी ग्रामीण पोलिसांच्या मानव संसाधन शाखेचे बाजीराव पोवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

 

तर कामती पोलिस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर उदार यांचीही बदली पुणे ग्रामीणमध्ये झाल्याने त्याठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे यांची बदली झाली आहे. मंद्रूप पोलिस ठाण्याचा पदभार आता पहिल्यांदाच पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला असून या पोलिस ठाण्याचा पदभार मंदिर सुरक्षा येथील शंकर पटवारी यांच्याकडे असणार आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्याकडे वेळापूर पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

स्थानिक गुन्ह े शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्याकडे नातेपुते पोलिस ठाणे, करमाळा पोलिस ठाण्याच े सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांच्याकडे माढा पोलिस ठाण्याचा पदभार दिला आहे. वेळापूर पोलिस ठाण्याच े सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची बदली स्थानिक गुन्ह े शाखेकडे करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी सध्याचा कार्यभार सोडून तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next Post

महाशिवरात्रीनिमित्त कुडल घाटावर फुलला ‘भक्तीसंगम

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

महाशिवरात्रीनिमित्त कुडल घाटावर फुलला ‘भक्तीसंगम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697