सोलापूर ; भीमा व सीना नदीच्या संगमात काटोकाठ भरलेले निळेश्वर पाणी, घाटावर साकारण्यात आलेली सुंदर रंगावली, हजारो दिव्यांनी उजळलेले प्रकाश, सूर्य मावळतीला जातानाचा सोनेरी रंगाचा पडलेली छाया, मुखी नमामि गंगे हर हर गंगे चा गजर, संगमेश्वर महाराजांचा जयजयकार अशा भक्तिमय वातावरणामध्ये रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हत्तरसंग कुडल (दक्षिण सोलापूर) येथे संगम आरती करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त हत्तरसंग कुडल (दक्षिण सोलापूर) येथे नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रवीवारी दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संगम आरती आयोजित करण्यात आली होती. मल्लिकार्जुन बिराजदार यांच्याहस्ते संकल्प पूजा करून संगम आरती करण्यात आली. प्रारंभी दीपप्रज्वलन प्रा. निलेश भिडे, सिद्धेश्वर बिराजदार, राजू लेंगरे यांच्याहस्ते तर विठ्ठल विजापूरे यांच्या हस्ते ओटी भरून नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आले.

दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. प्रारंभी संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादात आरती आणण्यात आली.
कृषी संस्कृतीचा विकास व्हावा, भीमा-सीना संगम नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अखंड वाहत रहावा, नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर देवस्थान समिती आणि भक्त मंडळांच्या वतीने संगम आरती आयोजित करण्यात आली होती. यंदा आरतीचे सातवे वर्ष होते. तत्पूर्वी पहाटेच्या सुमारास श्रींच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जगातील एकमेव दुर्मिळ अशा बहुमुखी शिवलिंगाचा अभिषेक करून, पूजा करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पाच वाजल्यापासूनच रांग लागली होती. बहुमुखी शिवलिंग, संगमेश्वरांचे शिवलिंग, पंचमुखी परमेश्वर शिवलिंगास बिल्वरचन पत्र अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. तसेच मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि आडत व्यापारी मल्लिकार्जुन बिराजदार यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. बिराजदार हे गेल्या 22 वर्षापासून हे महाप्रसाद व्यवस्था करत आहेत.

यावेळी काशिनाथ कुडले, मल्लिकार्जुन पाटील, संगप्पा केरके, आडत व्यापारी मल्लिनाथ बिराजदार, अण्णाराव पाटील, बसवराज बिराजदार, मधुकर बिराजदार हणमंत बगले, पंडित पुजारी, चिदानंद पुजारी, मल्लप्पा पाटील, मल्लिकार्जुन यमदे, काशिनाथ भतगुणकी, चन्नप्पा बगले, श्रीशैल पुजारी, सिध्दराम बिराजदार, शरणप्पा पाटील, शरणप्पा बिराजदार, विठ्ठल विजापूरे यांच्यासह आदि भाविक महाआरती गंगा आरतीच्या वेळेस उपस्थित होते. सूत्रसंचालन हणमंत बगले, प्रास्ताविक अणाराव पाटील, संगम आरतीची पार्श्वभूमी संगप्पा केरके यांनी केले.
