Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

सोमवारी पहाटे रुपाभवानी चौक येथे भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रविकांत बगले by रविकांत बगले
February 17, 2026
in क्राईम, सोलापूर
0
सोमवारी पहाटे रुपाभवानी चौक येथे भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोमवारी पहाटे रूपाभवानी मंदिराजवळ, सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज समोर झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्कूटरवरून घरी जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर कोसळले, तर स्कूटर काही अंतरावर फेकली गेली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: नागेश प्रकाश गवंडी (वय 27, रा. रविवार पेठ) रोहन अशोक कोरे (वय 23, रा. श्रीशैल नगर, भवानी पेठ) बसवराज सुनील चन्नशेट्टी (वय 25, रा. शेळगी) घटनेची माहिती मिळताच जोडभावी पोलीस ठाणे चे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

 

 

नागेश गवंडी टोलनाक्यावर कार्यरत होते, तर रोहन कोरे आणि बसवराज चन्नशेट्टी हे फायनान्स क्षेत्रात काम करत होते. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची बातमी परिसरात पसरताच तिन्ही कुटुंबीय व मित्रपरिवार सिव्हिल हॉस्पिटल येथे मोठ्या संख्येने जमले. आप्तस्वकीयांचा आक्रोश आणि हंबरडा यामुळे रुग्णालय परिसरात हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे

Previous Post

महाशिवरात्रीनिमित्त कुडल घाटावर फुलला ‘भक्तीसंगम

Next Post

इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड.

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post
इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड.

इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697