Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

तरुण अन् तरुणीने केली एकाच दिवशी केली आत्महत्या, दोन वेगवेगळ्या घटना : मंद्रुप पोलिस ठाण्यात नोंद

रविकांत बगले by रविकांत बगले
March 7, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तरुण अन् तरुणीने केली एकाच दिवशी केली आत्महत्या, दोन वेगवेगळ्या घटना :
मंद्रुप पोलिस ठाण्यात नोंद

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर आणि मंद्रूप येथे शुक्रवारी 6 मार्च रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक तरुण व एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पहिली घटना बसवनगर येथे घडली. पल्लवी किसन पवार (वय १९, रा.बसवनगर ता. दक्षिण सोलापूर) हिने अज्ञात कारणावरून राहत्या घरातील लोखंडी पाइपला काळ्या रंगाच्या साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवीचे वडील किसन लालसिंग पवार हे रिक्षा चालक असून, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते रिक्षा घेऊन बसवनगर येथील रिक्षा स्टॉपवर गेले होते. दरवाजा आतून बंद असल्याने संदेश पवार आणि रमेश नाईक यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता, हा प्रकार लक्षात आला. तिला ग्रामीण रुग्णालय, मंद्रूप येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.
दुसरी घटना मंद्रूप येथील सकलेश्वर गल्ली परिसरात घडली. अभिजीत सिद्रामप्पा मेंडगुदले (वय २५, रा. मंद्रूप)
या तरुणाने घराच्या गच्चीवरील खोलीत पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीतचा मंद्रूप येथे मोटारसायकल शोरूमचा व्यवसाय होता. गुरुवारी रात्री कुटुंबीय झोपी गेले होते.
पहाटे सुमारे पाच वाजता त्याचा भाऊ सुमित मेंडगुदले जागा झाल्यावर अभिजीत खोलीत नसल्याचे लक्षात आले. शेजारच्या खोलीत पाहिले असता, अभिजीत पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दोन्ही प्रकरणांची मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंद असून, हवालदार शिंदे व सहा. फौजदार बापू शिंदे, पोलीस नाईक सचिन मसलखांब करीत आहेत.

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद परिचारक; महिला जिल्हाध्यक्षपदी मृणालिनी शिंदे

Next Post

अंगणवाडी सेविका बालकांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया” – सीईओ कुलदीप जंगम

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

अंगणवाडी सेविका बालकांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया” – सीईओ कुलदीप जंगम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697