Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

सोलापूर जनता बँक निवडणुकीत ६ उमेदवारांचे अर्ज बाद; ४३ उमेदवार रिंगणात

आज दुपारी ३ पर्यंत माघारीची मुदत; बिनविरोध निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न

रविकांत बगले by रविकांत बगले
March 10, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जनता बँक निवडणुकीत ६ उमेदवारांचे अर्ज बाद; ४३ उमेदवार रिंगणा

आज दुपारी ३ पर्यंत माघारीची मुदत; बिनविरोध निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न


सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून ४९ अर्जांपैकी ६ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. दरम्यान आज (दि. १०) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून जोरदार हालचाली सुरू असून त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या प्रयत्नांना यश मिळेल, असा दावा सत्ताधारी गटाकडून केला जात आहे.
छाननीदरम्यान २५ किलोमीटर आतील मतदारसंघातून राजेंद्र ढोरे, पांडुरंग दिड्डी, नागेश ढवळे, नागेंद्र रव्वा आणि २५ किलोमीटर बाहेरील मतदारसंघातून विजय कुलकर्णी व चंद्रकांत वेदपाठक यांचे अर्ज बाद झाले आहेत.
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी येत्या १७ मार्च रोजी मतदान होणार असून २० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्यासह एकूण ४३ उमेदवार मैदानात आहेत.
२५ किलोमीटर आतील मतदारसंघातील १० जागांसाठी सुनील पेंडसे, भारत तांबोळकर, पुरुषोत्तम उडता, गिरीश बोरगावकर, राजेश पवार, अमोल कळके, आशिष सोमाणी, मल्लिनाथ शाबादे, बाबूराव म्हमाणे, जगदीश भुतडा, आनंद करवंदे, नरहरी मुळे, विष्णू मोंढे, परमेश्वर शिरोळे, बजरंग कुलकर्णी, अभिनंदन अगरथडे, प्रमोद भुतडा, महादेव न्हावकर, विश्वनाथ निरंजन, सुरेश चिक्कळ्ळी, राजन दिक्षित, हृषिकेश पुराणिक व संतोष शहा असे उमेदवार आहेत.
तर २५ किलोमीटर बाहेरील मतदारसंघातील ४ जागांसाठी विनोद कुचेरिया, हर्षल डंबळ, निलिमा कवठे, मिलिंद कुलकर्णी, पद्माकर पाटील, कपिल कुलकर्णी, अमित आपटे, आनंद आपटे, चरणसिंग चौहान व सुभाष पाटील हे उमेदवार मैदानात आहेत.
महिला प्रवर्गातील दोन जागांसाठी निलिमा कवठे, चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर व पूनम मालपाणी हे उमेदवार आहेत. तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील एका जागेसाठी रवींद्र साळे, सिद्धाराम चाबुकस्वार, बाबूराव म्हेत्रे, देवीदास गेजगे, सुभाष पाटील व कपिलदेव कोळी यांच्यात चुरस होणार आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच निवडणुकीतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने बँक वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

Previous Post

अर्थ विभागापुरतीच तदर्थ पदोन्नती का? जि.प. कर्मचारी महासंघाचा सवाल

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची घोषणा; रश्मी बागल गटनेतेपदी

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची घोषणा; रश्मी बागल गटनेतेपदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697