Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची घोषणा; रश्मी बागल गटनेतेपदी

प्रदीप खांडेकर उपनेते, चेतनसिंह केदार प्रतोद तर नेताजी खंडागळे प्रवक्ते

रविकांत बगले by रविकांत बगले
March 10, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची घोषणा; रश्मी बागल गटनेतेपद

प्रदीप खांडेकर उपनेते, चेतनसिंह केदार प्रतोद तर नेताजी खंडागळे प्रवक्त

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नव्या नेतृत्वाची टीम निश्चित करण्यात आली आहे. करमाळा येथील सदस्य रश्मी बागल यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत प्रथमच गटनेतेपदाची स्थापना करण्यात आली असून या पदावर बागल यांची नियुक्ती झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

याचबरोबर मंगळवेढा येथील प्रदीप खांडेकर यांची उपनेतेपदी, सांगोला येथील चेतनसिंह केदार यांची प्रतोदपदी तर दक्षिण सोलापूर येथील नेताजी खंडागळे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची प्रभावी टीम तयार झाली असून पुढील काळात विविध प्रशासकीय आणि विकासकामांमध्ये समन्वय साधून कामकाजाला वेग देण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

सोलापूर जनता बँक निवडणुकीत ६ उमेदवारांचे अर्ज बाद; ४३ उमेदवार रिंगणात

Next Post

जिल्हा परिषदेत वाहन चालक व परिचर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ; 90 जणांना सुधारित वेतन श्रेणी

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

जिल्हा परिषदेत वाहन चालक व परिचर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ; 90 जणांना सुधारित वेतन श्रेणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697