Wednesday, March 25, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

जिल्हा परिषदेत वाहन चालक व परिचर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ; 90 जणांना सुधारित वेतन श्रेणी

सातव्या वेतन आयोगानुसार लाभांचे आदेश • कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

रविकांत बगले by रविकांत बगले
March 10, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषदेत वाहन चालक व परिचर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ; 90 जणांना सुधारित वेतन श्रेण

सातव्या वेतन आयोगानुसार लाभांचे आदेश • कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावर
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेत वर्ग ०३ मधील वाहन चालक आणि वर्ग ०४ मधील परिचर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागामार्फत सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा (ACP) लाभ देण्यात आला असून एकूण ९० कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसदृश आर्थिक लाभाचे आदेश देण्यात आले आहेत.
या संदर्भातील आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी १० मार्च २०२६ रोजी जारी केले. या निर्णयामुळे वाहन चालक व परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार वाहन चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांपैकी पहिल्या लाभासाठी ३ तर तिसऱ्या लाभासाठी १ कर्मचाऱ्याला लाभ देण्यात आला आहे. तसेच परिचर संवर्गात पहिल्या लाभासाठी ४२, दुसऱ्या लाभासाठी २९ आणि तिसऱ्या लाभासाठी १५ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
या प्रक्रियेसाठी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे, प्रदीप सगट तसेच कनिष्ठ सहाय्यक अरविंदकुमार सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे सीईओ कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे कर्मचारी संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणाला किती लाभ?
वाहन चालक :
पहिला लाभ – ३
तिसरा लाभ – १
परिचर कर्मचारी :
पहिला लाभ – ४२
दुसरा लाभ – २९
तिसरा लाभ – १५
➡️ एकूण लाभार्थी : ९० कर्मचारी

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची घोषणा; रश्मी बागल गटनेतेपदी

Next Post

अक्कलकोट पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! रश्मी हिप्परगी सभापती,तर सागर कल्याणशेट्टी यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

अक्कलकोट पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! रश्मी हिप्परगी सभापती,तर सागर कल्याणशेट्टी यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697