Saturday, May 30, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

शिवसेनेत नवी जबाबदाऱ्या; धैर्यशील माने सोलापूर, तर ज्योती वाघमारे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख

रविकांत बगले by रविकांत बगले
March 31, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेनेत नवी जबाबदाऱ्या; धैर्यशील माने सोलापूर, तर ज्योती वाघमारे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख

सोलापूर : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी महत्त्वाच्या पातळीवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली आहे. तर शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुखपदी खासदार ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या असून पक्षाच्या लोकसभा स्तरावरील संपर्क व समन्वय अधिक मजबूत करण्याचा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जाते.
नियुक्तीनंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच इतर नव्याने नियुक्त झालेल्या संपर्कप्रमुखांचे त्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, तसेच मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेली ही जबाबदारी निश्चितच पक्षवृद्धीसाठी उपयोगात आणणार आहे.”
या नियुक्त्यांमुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक पकड अधिक मजबूत होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Previous Post

धनशेट्टी यांच्या कार्याचा गौरव; सेवानिवृत्ती सोहळ्यात जलजीवन मिशनच्या यशाची दखल

Next Post

३८ दिवसांच्या उपोषणानंतरही दखल नाही; महांतेश्वर कट्टीमनी यांचा १४ एप्रिलला मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

३८ दिवसांच्या उपोषणानंतरही दखल नाही; महांतेश्वर कट्टीमनी यांचा १४ एप्रिलला मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697