मुख्यालयात ज्यांचे ५ वर्ष पूर्ण; त्यांची होणार बदली
जिल्हा परिषद सोलापूरचे बदली शिबिर वेळापत्रक जाहीर

सोलापूर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद सोलापूरमध्ये मुख्यालयात सलग पाच वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे.
प्रशासनाने जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय बदली शिबिरांचे वेळापत्रक जाहीर केले असून ५, ६ आणि १८ मे २०२६ रोजी विविध विभागांसाठी ही शिबिरे पार पडणार आहेत. या उपक्रमामुळे बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुसूत्र आणि वेगवान होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही सर्व शिबिरे आयोजित करण्यात येणार असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
५ मे : विभागनिहाय बदली शिबिर.
१०.०० ते ११.०० – सामान्य प्रशासन विभाग
११.०० ते १२.३० – ग्रामपंचायत विभाग
१२.३० ते १.३० – आरोग्य विभाग
२.०० ते ३.०० – महिला व बालकल्याण विभाग
३.०० ते ५.०० – शिक्षण विभाग
६ मे : विविध तांत्रिक विभागांची प्रक्रिया.
१०.०० ते १०.३० – अर्थ विभाग
१०.३० ते ११.०० – कृषी विभाग
११.०० ते १.०० – जलसंधारण व ग्रामीण पाणीपुरवठा
१.०० ते २.०० – पशुसंवर्धन विभाग
१८ मे : तालुकास्तरीय शिबिर.
१०.०० ते १२.०० – ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी
१२.०० ते २.०० – बांधकाम, आरोग्य व इतर विभाग
अनेक वर्ष मुख्यालयातच ठाण मांडून असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.