Saturday, May 30, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

सोलापुरात माणुसकीचा महाउत्सव! अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त १४ ठिकाणी भव्य समाजोपयोगी उपक्रम

रविकांत बगले by रविकांत बगले
April 9, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात माणुसकीचा महाउत्सव! अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त १४ ठिकाणी भव्य समाजोपयोगी उपक्रम

सोलापूर प्रतिनिधी:
प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यात तब्बल १४ ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे सोलापुरात खऱ्या अर्थाने “माणुसकीचा महोत्सव” साजरा होणार आहे.


या उपक्रमांचा शुभारंभ सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून करण्यात येणार आहे. याच ठिकाणी इतर सर्व उपक्रमांचीही सुरुवात होणार असून मोठ्या संख्येने मान्यवर व नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे तन्वीर शेख व राज सलगर यांनी दिली.
या भव्य उपक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबन या चार महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील २०० विद्यार्थिनींना सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी २०० महिलांना शिलाई मशीन देऊन स्वावलंबनाचा मार्ग खुला केला जाणार आहे. अनाथ आश्रमासाठी ५० बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट बसवले जाणार असून, विविध शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड व १० शाळांमध्ये संगणक संच देण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळणार आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहर व जिल्ह्यातील १०० ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची पात्रे बसवून नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच कुंभारी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरमध्ये बोअरवेल व सबमर्सिबल पंप बसवून ग्रामस्थांच्या पाण्याची सोय केली जाणार आहे.
याशिवाय वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी व मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप करण्यात येणार असून, गेनसिद्ध देवालय येथे ५८.५ केव्हीए क्षमतेचा जनरेटर बसविण्यात येणार आहे.
आरोग्य क्षेत्रातही मोठा दिलासा देत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांसाठी १०० विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यात सेवा, सहकार्य आणि माणुसकीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनचे धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर व धीरज कारंडे यांनी केले आहे.

वाढदिवस उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये :
सोलापूर शहर-जिल्ह्यात १४ ठिकाणी एकाच दिवशी उपक्रम
५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किट
३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक
१ हजार विद्यार्थ्यांना बॅग, २०० मुलींना सायकली
२०० महिलांना शिलाई मशीन
१०० मोफत शस्त्रक्रिया
शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर विशेष भर
— सोलापुरात समाजसेवेचा भव्य महाउत्सव!

Previous Post

सोलापूरात ९ ते १४ एप्रिल दरम्यान ‘समता सप्ताह’ संविधान मूल्यांची जनजागृती; १ हजारांहून अधिक उद्देशिकांचे वितरण.

Next Post

मैत्रीवर अफवांचा पडदा; वाढदिवसानिमित्त एकोप्याचे दर्शन

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

मैत्रीवर अफवांचा पडदा; वाढदिवसानिमित्त एकोप्याचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697