मैत्रीवर अफवांचा पडदा; वाढदिवसानिमित्त एकोप्याचे दर्शन

सोलापूर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंते नरेंद्र खराडे (बांधकाम-1) आणि संतोष कुलकर्णी (बांधकाम-2) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी अशा सर्व अफवा फेटाळून लावत आपल्या मैत्रीचे ठाम उदाहरण दिले आहे.
कामकाजादरम्यान मतभेद होणे स्वाभाविक असले, तरी त्याला वादाचे स्वरूप देणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही जणांकडून घडून न आलेल्या घटनाही घडल्याप्रमाणे सांगितल्या जात असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, आज संतोष कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र खराडे यांनी आपल्या संपूर्ण स्टाफसह उज्जैन येथील प्रसाद खाऊ घालत त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दोघांमधील स्नेह आणि परस्पर आदर स्पष्टपणे दिसून आला.
या घटनेमुळे दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, ही केवळ अफवांची निर्मिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.