Sunday, May 31, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

मोहोळ-वळसंग महामार्गाच्या श्रेयावरून राजकीय वाद पेटला ७४० कोटींचा निधी आमच्या प्रयत्नांतूनच; प्रणिती शिंदे यांचा दावा हास्यास्पद – आमदार सचिन कल्याणशेट्टी.

रविकांत बगले by रविकांत बगले
May 8, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, प्रतिनिधी :

मोहोळ-वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर झालेल्या ७४० कोटी रुपयांच्या निधीवरून सोलापुरात राजकीय वातावरण तापले असून, या निधीचे श्रेय घेण्यावरून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “जिल्हा नियोजन समितीच्या निधीसाठी आंदोलन करण्याची वेळ आलेल्या खासदार प्रणिती शिंदे आता राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
गुरुवारी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष इंद्रजित पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस पक्ष व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
मोहोळ-वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी ७४० कोटींचा निधी मंजूर होण्यासाठी आमदार सुभाष देशमुख आणि आपण स्वतः सातत्याने पाठपुरावा केला असल्याचा दावा त्यांनी केला. “केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कामाला मंजुरी दिल्यानंतर आमदार सुभाष देशमुख व मलाही अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय आम्हा दोघांनाच जाते,” असे ते म्हणाले.
आमदार सुभाष देशमुख आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “आराखडा मंजूर झाल्यानंतर पत्र लिहून श्रेय घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे,” असा टोला त्यांनी खासदार शिंदे यांना लगावला.
यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरही निशाणा साधला. “जनमताअभावी काँग्रेस पक्ष लोप पावत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी तारतम्य बाळगावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.

“स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी नेत्यांनी मतदारसंघात थांबणे आवश्यक आहे. मात्र खासदार शिंदे या कायम दिल्ली-मुंबई वारीत व्यस्त असतात. देशात राहुल गांधी आणि सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा सुपडा साफ होत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना, “त्यांनीही थोडा संयम बाळगावा,” असा उपरोधिक टोला आमदार कल्याणशेट्टी यांनी लगावला.

*१४ मे रोजी नितीन गडकरी अक्कलकोट दौर्‍यावर.

अक्कलकोट तालुक्यातील विविध रस्त्यांच्या लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे १४ मे रोजी अक्कलकोट दौर्‍यावर येणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. त्यांच्या दौर्‍याचा अधिकृत कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले

Previous Post

पात्रता नसताना टीका; ‘प्रसिद्धीचा स्टंट’ – आमदार कोठे यांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल.

Next Post

सर्पदंश व श्वानदंश लसींसाठी निधी वाढविणार; पाणी गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या आरोग्य समिती सभेत सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांचे निर्देश

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

सर्पदंश व श्वानदंश लसींसाठी निधी वाढविणार; पाणी गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या आरोग्य समिती सभेत सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697