Saturday, May 30, 2026
Solapurnewsplus
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Solapurnewsplus
No Result
View All Result

एनटीपीसी सोलापूरमध्ये ‘बालिका सशक्तीकरण मिशन -2026’चा भव्य शुभारंभ

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार; ५० बालिकांची निवड.

रविकांत बगले by रविकांत बगले
May 12, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एनटीपीसी सोलापूरमध्ये ‘बालिका सशक्तीकरण मिशन -2026’चा भव्य शुभारंभ
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार; ५० बालिकांची निवड.

 

सोलापूर प्रतिनिधी :

एनटीपीसी च्या सोलापूर प्रकल्पात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सी एस आर) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘बालिका सशक्तीकरण मिशन (GEM)-2026’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींच्या शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्यवृद्धीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, यंदा सुमारे ५० बालिकांची निवड करण्यात आली आहे.


दि. १० मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून या एक महिन्याच्या निवासी कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी . जी इ एम उपक्रमावर आधारित प्रेरणादायी चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले. या माध्यमातून सहभागी बालिकांना विविध प्रशिक्षण, उपक्रम आणि उपलब्धींची माहिती देण्यात आली.


कार्यक्रमाला कार्यकारी संचालक बी. जे. सी. शास्त्री, मुख्य महाव्यवस्थापक एम. के. बेबी, महाव्यवस्थापक सुभाषीस बंद्योपाध्याय, पद्मा शास्त्री, सिबी बेबी तसेच एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि सृजना महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना बी. जे. सी. शास्त्री यांनी, “बालिकांचे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्य संवर्धन हे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ आहेत.

जी इ एम सारखे उपक्रम मुलींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि नवे विचार विकसित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात,” असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान माजी सहभागी विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन करताना या उपक्रमामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे नव्याने सहभागी झालेल्या बालिकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
समारोपावेळी सहभागी बालिकांना किटचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून त्यांच्या नव्या शिक्षण आणि विकास प्रवासाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
दरवर्षी भव्य स्वरूपात होणारा हा उपक्रम मुलींचे शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि समावेशक विकासासाठी एनटीपीसी ची असलेली बांधलकी अधोरेखित करते.

Previous Post

महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांची ९२.४२ दहावीतील यशाची परंपरा कायम

Next Post

विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सर्व राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणांनी नियमांचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रविकांत बगले

रविकांत बगले

Next Post

विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सर्व राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणांनी नियमांचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • खेळ
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697